लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
परिपक्व बचत गटांना (नॉन एसजीएसवाय) विविध व्यवसायाकरीता
मध्यम मुदती कर्ज मंजुरीचे धोरण
उद्देश परिपक्व बचत गटांना कृषी माल उत्पादनाकरीता, शेतीपुरक व्यवसाय व गुंतवणूकीकरीता.
पात्रता

सदर कर्जाच्या पात्रतेसाठी बचत गट स्थापन होऊन कमीत कमी 3 वर्ष झालेला असावा व सदर गटांनी बँकेकडून कमीत कमी 2 वेळा कर्ज घेतलेले असावे व सदर कर्जाची परतफेड नियमित असावी.

कर्जाची रक्कम अशा परिपक्व बचत गटांना कर्जाची रक्कम त्यांचे एकुण व्यवसायाच्या प्रकल्प खर्चापोटी त्यांच्या एकुण बचतीच्या 4 पट एवढी कर्ज मर्यादा मंजुर करता येईल. उर्वरीत प्रकल्प खर्च बचत गटांना स्वगुंतवणूकीतून करावा लागेल.
कर्जाचा कालावधी बचत गटाला दिलेलया कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्शाचा राहील. मात्र कर्जाचे हप्ते व गे्रस पिरेड व्यवसायानुसार निष्चित केले जाईल.
व्याजदर 1) सदर कर्जावर व्याजाचा दर द.सा.द.शे. महिला बचत गटांन करिता कर्ज रु ३.०० लाखपर्यंत ७% व्याज दर आणि पुरुष व मित्र बचत गटांन करिता रु १२.५०% व्याज दर.
2) कर्ज हप्ता थकीत झाल्यास थकीत रक्कमेवर 1% जादा दंड व्याज.
विमा (Insurance) कर्जातून खरेदी केलेल्या साहित्याचा विमा बँक व गट यांचे संयुक्त नांवाने काढावा लागेल. तसेच दरवर्षी बचत गटाला स्वखर्चाने विम्याचे नुतणीकरण् करावे लागेल.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे

1) स्वयं सहाय्यता बचत गटाने रु. 100/- चे बँकेत भरणा करुन नाममात्र सभासद झाल्याचा तपशील
2) कर्ज मागणी अर्ज बँकेनी पुरविलेल्या विहित नमुन्यात.
3) बचत गटातील प्रत्येक सभासदाच्या व्यवसायाच्या पत पुरवठयाबाबत आराखडा तयार करुन गटाच्या माध्यमातून बँकेला सादर करावा लागेल.
4) ज्या व्यवसायासाठी परिपक्व बचत गटांना कर्ज मंजूर करावयाचे आहे. त्या व्यवसायाचा सभासद निहाय क्रेडीट प्लॅन गटांनी तयार करुन बँकेला सादर करावा लागेल.
5) सदर योजने अंतर्गत आवश्यक असणा-या व्यवसायाला ग्रामपंचायत किंवा तत्सम संबंधीत विभागाकडून/खात्याकडून व्यवसाय परवाना प्रमाणपत्र बँकेला सादर करावा लागेल.
6) हत्यारे, अवजारे, मषीनरी व इतर यंत्र समुग्रीकरीता कर्ज मागणी अर्जासोबत अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन बँकेला सादर करावे लागेल.

जादा अटी

1) बचत गटातील सभासद व त्यांच्या कुटुंबातील सभासद कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
2) कर्ज वितरण करतांना गटाला वचन चिट्ठी, करारनामा व इतर आवष्यक कागदपत्रे भरुन द्यावे लागेल.
3) कर्जाच्या सुरक्षिततेच्या दृश्टीने रिझर्व बँकेच्या नोमर्स प्रमाणे व वेळोवेळी देण्यात येणा-या दिशा निर्देशाप्रमाणे गटाकडून हमी घेण्यात येईल.
4) वरील अटी शिवाय सदर योजनेअंतर्गत रिझर्व बँक/नाबार्ड/महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी वेळोवेळी दिलेल्या अटी/शर्ती बचत गटाला बंधनकारक राहील.

   
Designed by Trust Systems