दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिझव्र्ह ब्ँक आँफ इंडिया/नाबार्ड यांना दिलेले आर्थिक निकश, आधुनिक तंत्रज्ञान व बँकिंग व फायनाँन्सीयल क्षेत्रातील ग्राहक सेवा या स्थितीवर दि.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आयएसओ 9001:2008 मानांकन प्राप्त झाले असुन, आयएसओ मानांकन प्राप्त होणारी महाराश्टातील रायगड मध्यवर्ती बँकेनंतर दुसरी, तर विदर्भातील ही पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे.
आयएसओ 9001:2008 चे प्रमाणपत्र हैद्रबादचे आंतराश्टीय गुणवत्ताधारक लेखापरीक्षक श्रीभाश दत्ता यांच्याकडुन बँकेचे मुख्यकार्यकारी सतिष आयलवार यांनी स्वीकारले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक अरूण निंबेकर, उपव्यवस्थापक (प्रषासन) टि.डब्लु भुरसे़, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना 8 नोव्हेंबर 1985 ला झाली त्यावेळी बँकेच्या 14 षाखा , तसेच 4.50 कोटींच्या ठेवी व 5.52 कोटींचा व्यवसाय होता. मागील 29 वर्शात बँकेने आजच्या स्थितीत 31 मार्च 2014 अखेर 1200 कोटींचा व्यवसाय गाठला असुन आज 50 षाखा व 4 विस्तारीत कक्ष असुन, सर्व षाखा सीबीएस प्रणालीषी जोडलेल्या आहेत. बँकेने आरटीजीएस / एनईएफटी /ईसीएस प्रणाली आरबीआयकडुन प्राप्त होणारी महाराश्टातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे.
|