लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.
E-Commerce

ई-कॉमर्स (इलेक्ट्रॉनिक कॉमर्स)

इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ई-कॉमर्स म्हणून देखील ओळखले जातात ज्यामध्ये संगणक नेटवर्क आणि इंटरनेटसारख्या इलेक्ट्रॉनिक सिस्टिमद्वारे उत्पादनांची किंवा सेवांची खरेदी आणि विक्री समाविष्ट असते. ग्राहक आपल्या रूपे ए.टी.एम. कार्ड द्वारे शॉपिंग, मोबईल व डी.टी.एच. रिचार्ज, प्रवास तिकीट बुकिंग (रेल्वे, फ्लाईट, हॉटेल, इत्यादी) अश्याप्रकारचे अनेक सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग करता येतील.


ई-कॉमर्सचे फायदे:

  • 24 तास वस्तू/सेवा खरेदी करण्याची क्षमता.
  • जगात कुठल्याही बाजारातून घरबसल्या वस्तू / सेवा खरेदी.
  • वस्तू कमी दरात खरेदी करून पैश्यांची बचत.
  • अक्षम लोकांना घरबसल्या स्वत: ची खरेदी करण्याची सुविधा.
  • वस्तू/ सेवा खरेदी करण्यासाठी प्रवास करण्याची गरज नाही.


ई-कॉमर्स प्रणाली द्वारे व्यवहार करताना लक्ष्यात घ्यावयाच्या बाबी

१. Card Number: - रूपे ए.टी.एम. कार्ड वर दिलेल्याप्रमाणे १६ अंकी नंबर टाकावे.
२. Expiry Date: - रूपे ए.टी.एम. कार्ड वर Valid Upto मध्ये दर्शविल्यानुसार महिना, वर्ष व ए.टी.एम. कार्डच्या मागल्या बाजूस दिलेले CVV नंबर टाकावे.
३. Card Holder Name: - रूपे ए.टी.एम. कार्ड हा इन्स्टा कार्ड असल्यास खाते नावानुसार Card Holder Name या फिल्ड मध्ये संपूर्ण नाव टाकावे किंवा रूपे ए.टी.एम. कार्ड हा Personalize कार्ड असल्यास कार्ड वर दिलेल्या ग्राहकाच्या संपूर्ण नावाप्रमाणे टाकावे.
४. Make Payment: - संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर Make Payment या पर्यायावर सिंगल क्लिक करावे.

  • यानंतर Payment Process करतांना Generate and enter one time password या पर्यायाला टिक करून Submit बटनवर क्लिक करावे.
  • Submit बटनवर क्लिक केल्यानंतर ए.टी.एम. कार्ड धारकाचे नाव व मोबईल क्रमांक दर्शविण्यात येईल. दर्शविलेली माहिती तपासून Generate OTP बटन वर क्लिक करावे. टीप: - OTP (One Time Password) पेज वर मोबईल क्रमांक “00XX0XXX00” दर्शवित असल्यास संबंधी ग्राहकांनी मोबईल क्रमांक “Update” करण्याकरिता ०७१३२-२३३५७१ वर संपर्क करावा.
  • Generate OTP वर क्लिक केले असता तुमच्या रजिस्टर्ड मोबईल क्रमांकावर (OTP पेज वर दर्शविण्यात आलेला मोबईल क्रमांकावर) प्राप्त OTP नंबर टाकून Submit बटनवर क्लिक करावे.

Designed by Trust Systems