लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
GDCC BANK - Cash less System

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कॅशलेस बँकिंग प्रणालीचा शुभारंभ

गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयामध्ये आज २३ जानेवारी रोजी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोराड्डीवार यांच्या हस्ते कॅशलेस बँकिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, सचिव अनंत सावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयालवार, व्यवस्थापक निंबेकार उपस्थीत होते.

अन्य बँकांमार्फत पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार कर्ज

अन्य बँकांमार्फत पगार देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील जिल्हा बँक कर्ज सुविधा उपलब्ध करणार आहे. याचा फायदा १० हजार पोलीस आ ४ – ५ हजार इतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. जिल्हा बँकेमार्फत डिजिटल आर्थीक साक्षरतेवर जनजागृती केली जात असून आतापर्यंत २३ हजार नागरिकांनी या उपक्रमात भाग घेतल्याचे पोराड्डीवार म्हणाले.

१५० मायक्रो एटीएम सुरु करणार ज

दुर्गम भागात बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधीच्या माध्यमातून १५० मायक्रो एटीएम स्थापन करण्यात येणार आहेत. या माध्यमातून रोख रक्कम जमा करण्याची सुविधा, रक्कम काढण्याची सुविधा, शिल्लक रक्कमेची चौकशी करण्याची सुविधा, मिनी स्टेटमेंट काढण्याची सुविधा, फंड ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार डिजिटल बँकिंग सुविधा सुरु केली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत ३१ हजार ग्राहकांना रूपे डेबिट कम एटीएम कार्ड व जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एटीएमचे जाळे विणण्यात येणार असून एसएमएस व शिल्लक रकमेच्या माहितीसाठी मिसकॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत..

डिजिटल बँकेस देणार चालना

मध्यवर्ती बँकेच्यावतीने डिजिटल बँकेस चालना दिली जाणार आहे. या अंतर्गत मोबाईल बँकिंग, युपीआय अॅप, डेबिट कार्ड, पीओएस मोबाईल टॅब, बँक ई-कॉमार्स आदी बाबींना चालना दिली जाणार आहे.

Designed by Trust Systems