माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे ‘बेस्ट सायबर सिक्युरिटी उपक्रम’ व बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘बेस्ट आयटी हेड’ हे दोन पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण १९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे होणार आहे.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीट व बँकिंग फंटीअर्सतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामकाजाबद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. या वर्षीचे दोन पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीला जाहीर झाले आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाखांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मार्फत ग्राहकांना एटीएम, मोबाइल बँकिंग, यूपीआय, क्यूआर कोड, आयएमपीएसई अत्याधुनीक डिजिटल बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. येत्या काही दिवसांत ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाचे फलित असल्याचे
म्हटले आहे.