Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: gdcc_support@gdccbank.com |         Apply Now         |

‘बेस्ट मोबाइल अॅप’, ‘बेस्ट इन्व्हेस्टमेंट’ बद्दल सन्मान

 

बैंको ब्ल्यू रिबन पुरस्कारानंतर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातली. बँकिंग फटोअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल देण्यात येणाऱ्या “बेस्ट मोबाइल अॅप” व “बेस्ट इन्व्हेस्टमेंट या दोन पुरस्काराने गोवा येथे नुकताच सन्मान झाला.

 

गोवा येथे झालेल्या या कार्यक्रमात तेथील सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत बँकेचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आपलवार, बँकेचे लेखा विभागाचे सरव्यवस्थापक संजय अलमपटलावार व माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपसरव्यवस्थापक हर्षवर्धन भडके यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

 

याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक मंडळ यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

 

बँकेचे खातेदार, शेतकरी, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्यामुळेच हे पुरस्कार मिळाले, अशी प्रतिक्रिया बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी व्यक्त केली.

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli, Tal. Gadchiroli,
Dist. Gadchiroli – 442605

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570
Mail Us: gdcc_support@gdccbank.com

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2024 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design
error: Content is protected !!