महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधुन सन २०२०-२१ करिता स्वयंसहायता बचत गटांना बँकेतर्फे कर्ज पुरवठा करुन ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योगा मार्फतिने विकासाचे प्रवाहात आणल्याबद्द्ल जिल्हा मध्यवर्ती बँकेस उमेद अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री हसन मुश्रिफ यंच्याहस्ते राज्यमंत्रि अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डिवार व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीमधुन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रज्यस्तरिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, उमेद अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधन युवराज टेंभुर्णे उपस्थित होते.