दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसीएशन मुंबई, दरवर्षी महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देवुन सन्मानीत करते. सन २०२३-२४ या वर्षाचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दि. २३ जुलै २०२५ ला मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॉ. दुर्वेश भोयर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी स्विकारला.
बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सर्व संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी सदर पुरस्काराचे श्रेय जिल्ह्यातील बँकेच्या सर्व खातेदार, बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला बचत गटांचे सर्व सदस्य व सर्व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच सदर पुरस्कार प्राप्त झाला असे नमुद केलेले आहे.