लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
वेअर हाऊस पावतीचे तारणांवर वैयक्तीक कर्ज धोरण
अटी व शर्ती :
उद्देश 1) शेतकरी सभासदास शेती विषयक आर्थिक गरजा भागविण्याकरीता व तत्सम इतर कारणाकरीता.
पात्रता सभासद हा शेती धारण करणारा व सेवा सहकारी संस्थेचा सभासद असला पाहिजे. अशा सभासदास त्याने उत्पादित केलेला माल वेअर हाऊसमध्ये ठेवला असल्यास अशा वेअर हाऊस पावतीच्या तारणावर शेतकरी सभासद कर्जास पात्र राहिल.
कर्जाची रक्कम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे/वेअर हाऊस तारण पावतीच्या 75% किंवा जास्तीत जास्त रु. 1.00 लाख (एक लाख) यापैकी जी कमी असेल तेवढया रक्कमेपर्यंत कर्ज मंजुर करता येईल.
कर्जाचा कालावधी या कर्जाची मुदत जास्तीत जास्त 6 महिन्याची राहील व कमीत कमी 1 महिन्याची राहिल.
व्याजदर 1) या कर्जावर व्याजदर द.सा.द.शे. 12% राहिल.
2) कर्ज थकीत झाल्यास त्यावर द.सा.द.शे. 1% दंड व्याज.
विमा (Insurance)  
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज घेणारा सभासद हा बँकेचा सभासद किंवा नामधारी सभासद झाल्याचा तपशील.
2) शेतकी पत संस्थेचा सभासद आपला उत्पादित शेतमाल वखार महामंडळात/वेअर हाऊसमध्ये ठेवून त्याबाबतची सदरील शेतमालाचे पावतीच्या तारणावर फॉर्म नं. 1 कर्ज मागणी करीता अर्ज त्यासोबतच फॉर्म नं. 2 तसेच फॉर्म नं. 3 वखार महामंडळ वेअर हाऊस मॅन कडून आणावे.
3) सभासद ज्या संस्थेचा सभासद असेल त्या संस्थेचा कर्ज बाकीचा दाखला कर्ज मागणी अर्जासोबत जोडावा लागेल.
ज्यादा अटी 1) हे कर्ज नाशवंत वस्तुच्या तारणावर तसेच कापसावर दिले जाणार नाही, अन्न धान्य, गळतीचे धान्य व तेलबिया यासारख्या शेतमालावर असे कर्ज देता येईल.
2) वेअर हाऊस रिसीप्ट बँकेच्या नांवाने गहाण करुन घेतली जाईल.
3) वेअर हाऊसमध्ये ठेवलेला माल हा कर्ज घेतलेल्या तीन ते चार महिन्यापेक्षा अधिक काळापुर्वी उत्पादित झालेला नसावा.
4) दिलेल्या मुदतीत सभासदाने माल तारण कर्जाची व्याजासह पुर्णपणे फेड न केल्यास वेअर हाऊस मधील तारण माल ताब्यात घेवून त्या मालाची विक्री मार्केट मध्ये करुन कर्ज व्याजासहित व खर्चासहित वसूल केले जाईल. तसा अधिकार बँकेला राहिल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   
Designed by Trust Systems