लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
स्वयं सहाय्यता बचत गट (नॉन एसजीएसवाय) कॅश क्रेडीट
कर्ज मर्यादा मंजुरीचे धोरण
उद्देश ग्रामीण भागातील दारीद्रयाचे निमुर्लन होण्याच्या द्रुष्टीने पुर्णतः जिल्हयातील स्वयंसहाय्यता बचत गटातील सभासदांना लघु उद्योग, कुटीर उद्योग व इतर तत्सम व्यवसाय करण्याकरीता.
पात्रता स्वयं सहाय्यता बचत गटाला कर्जाच्या पात्रतेसाठी सदर बचत गट स्थापन होऊन 6 महिने पुर्ण झाले असून सदर बचत गटाची नियमित बचत असणे आवश्यक आहे व बचत गटाने अंतर्गत कर्ज व्यवहार, ग्रेडेशन, हिशेब इत्यादींचा योग्य व्यवहार झाला पाहिजे व अशा गटाची योग्यरितीने पडताळणी करुन तसेच बचत गटाला बँकेकडून कर्ज पात्रतेसाठी शाखा स्तरावरुन केलेल्या मुल्यमापण अहवालात बचत गट ‘अ’ किंवा ‘ब’ श्रेणीत असणे आवष्यक आहे. असेच बचत गट या योजनेस पात्र राहतील.
कर्जाची रक्कम प्रथम कर्ज मागणी करणा-या स्वयं सहाय्यता बचत गटाला (नॉन एसजीएसवाय) त्याच्या एकुण बचतीच्या 1:1 किंवा 1:2 च्या प्रमाणात बँकेद्वारे कर्ज मंजुरीची रक्कम पात्र राहिल.
कर्जाचा कालावधी स्वयं सहाय्यता बचत गटाला (नॉन एसजीएसवाय) दिलेल्या कर्ज मर्यादेचा कालावधी 1 वर्षाचा राहिल. प्रथम मंजूर झालेली कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा पुढे सुरु ठेवायची असल्यास बचत गटाला सदर कर्जाची मुदत संपण्यापुर्वी 1 महिन्याच्या आंत नुतणीकरण प्रस्ताव सादर करुन मुदत पुढील वर्शापर्यंत वाढवावी लागेल.
व्याजदर 1) स्वयं सहाय्यता बचत गटांना कॅश क्रेडीट कर्ज मर्यादेचा व्याज द.सा.द.शे. महिला बचत गटान करीत कर्ज रु ३.०० लाखापर्यंत ७% व्याज दर. पुरुष व मित्र बचत गटान करीत रु १२.५०% व्याजदर .
2) थकीत कर्जावर 1% जादा दंड व्याज.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज मागणी अर्ज बँकेच्या विहित नमुन्यात.
2) स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकेचे नाममात्र सभासद फी रु. 100/- बँकेत भरणा करुन नाममात्र सभासद झाल्याचा तपशील
3) गटाचा कर्ज मागणी ठराव इ.
जादा अटी 1) स्वयं सहाय्यता बचत गटाने कॅश क्रेडीट कर्ज मर्यादेचा व्यवहार समाधाने कारक केला पाहिजे. अन्यथा सदर बँक कर्ज व्याजासहित तात्काळ वसुलीस पात्र राहिल व त्याची संपुर्ण जबाबदारी गटातील सर्व सभासदांची राहिल.
2) बचत गटाने 1) कार्यवाही बुक 2) सभासद रजीस्टर 3) बचत ठेव रजिस्टर 4) कर्जाचे रजिस्टर रोकड वही व सर्व व्यवहाराचा हिशेब इ. रेकॉर्ड ठेवणे गटाला अनिवार्य आहे.
3) स्वयं सहाय्यता बचत गटांना कर्ज वितरण करतांना प्रोमीसरी नोट व कन्टीन्युटी गॅरंटी बॉन्ड इ. आवश्यक कागदपत्रे भरुन द्यावे लागेल.
   
Designed by Trust Systems