लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शेतकरी सभासदांना मध्यम मुदती थेट कर्ज धोरण
उद्देश जिल्हयातील शेतकरी सभासदांना पाणी पुरवठा सुविधा अंतर्गत शेती व्यवसायाकरीता
पाणीपुरवठा सुविधेसाठी.
पात्रता सदर कर्जासाठी सभासदाकडे 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे. मात्र विहिरीकरीता व बोअरवेलकरीता 2.50 एकर जमीन असणे आवश्यक आहे. असे सभासद कर्ज मिळण्यास पात्र समजण्यात येईल.
कर्जाची रक्कम सभासदास पाणी पुरवठा कर्ज मर्यादा मंजुरीसाठी प्रथम एकुण बांधकामाच्या 15% स्वगुंतवणुकीची रक्कम बँकेत भरणा करावी लागेल. उर्वरीत 85% कर्जाची रक्कम सभासदास कर्ज रुपाने मंजूर करता येईल.
कर्जाचा कालावधी कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा राहिल.
व्याजदर बँकेचा सदर कर्जावरील व्याजाचा दर द.सा.द.शे. 14% राहिल. व्याज हप्ता थकीत झाल्यास 1% जादा दंड व्याज.
विमा (Insurance) सभासदाने निर्माण होणा-या सर्व संपत्तीचा (साहित्य व सामुग्री) पुरेशा रक्कमेचा विमा कर्जदार सभासद व बँकेच्या संयुक्त नांवाने काढावयास पाहिजे. तसेच वेळोवेळी विमा पॉलिसीचे नुतणीकरण सभासदास स्वखर्चाने करुन घ्यावे लागेल.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहित नमुन्यात.
2) सभासद व जामीनदार रु. 100/- बँकेत भरणा करुन नाममात्र सभासद झाल्याचा तपशील.
3) विहिर व बोअरवेल करीता जीएसडीए यांचे पाणी उपलब्ध असल्यास प्रमाणपत्र द्यावे लागेल.
4) 7/12 सामाकि भागीदाराचे नांव असल्यास त्यांचे संमतीपत्र रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर.
जादा अटी 1) सभासद कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
2) कर्जातून निर्माण होणा-या मालमत्तेचे तारण गहाण खत/नजरगहाण खत सभासदाने करुन दिले पाहिजे.
3) जर सभासद ठेकेदाराकडून खोदकाम व बांधकाम करुन घेत असल्यास ठेकेदाराकडून केलेल्या कामाचा तपशील व त्याकरीता लागणा-या खर्चाची पावती लिहून घेवून ठेकेदाराला डि.डि. द्वारे ती रक्कम अदा करण्यांत येईल. त्याकरीता कर्जदारास काम पुर्ण व समाधानकारक आल्याबाबत लेखी द्यावे लागेल.


   
Designed by Trust Systems