लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँक बँको पुरस्काराने सन्मानित
पुरस्कारांचे षटकार  

देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांना अविज पब्लिकेशन कोल्हापूर आ गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘बँको’ पुरस्कार देण्यात येत असून २०१५ -१६ चा पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच प्रदान करण्यात आला.

रिपोर्ट रिओ गों येथे ७ मार्चला आयोजित समारंभात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक दत्तात्रय काळे यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत सावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयालवार, व्यवस्थापक अरुन निंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला देशातील जिल्हा सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी उपस्थित होते.

रिझर्व बँकेच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ठ काम करणाऱ्या आ आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार २०१५ – १६ या आर्थिक वर्षात ‘ ठेव वृद्धी श्रेणीत ’ केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल देशातील सहकारी बँकांच्या श्रेणीतून प्रथम क्रमांकाचा बँको २०१६ पुरस्कार गडचिरोली सहकारी बँकेला प्रदान करण्यात आला.

गडचिरोली बँक ५५ शाखांच्या माध्यमातून ४ लाख २६ हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. जिल्ह्यातील बँकेच्या ग्राहकांना अत्याधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीव्दारे सुरु करण्यात आल्या असून, बँकेत आरटीजिएस, एनईएफटी, ईसीएस, एसएमएस, एटीएम, एनिवेअर, रुपे डेबिट कार्ड, रूपे केसीसी कार्डची सुविधा सुरु केली आहे. शिवाय बँकेच्या १० शाखामार्फत सुवर्ण तारण कर्ज, गोल्ड प्युआरीटी मशीनव्दारा तत्काळ कर्ज देण्याची सोय करण्यात आली असून त्याचा जिल्ह्यातील अनेक ग्राहक लाभ घेत आहेत.

बँकेच्या यशस्वी वाटचालीत जिल्ह्यातील शेतकरी बँकेचे ग्राहक, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, व्यापारी व हितचिंतकाच्या विश्वासामुळेच बँकेने हे यश संपादित केल्याचे बँकेने म्हटले आहे.

Designed by Trust Systems