जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सहकारक्षेत्राचा सहभाग आणि योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला विकसित करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची ग्वाही राज्याचे सहकारीमंत्री मा.श्री.हर्षवर्धन पाटील व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.आर.आर.पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत जिल्ह्यातील सहकारी संस्था सभासदांना 97 व्या घटना दुरूस्तीच्या अनुषंगाने मार्गदर्षन करण्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने हा सहकार मेळावा आयोजित केला होता. उद्घाटन सहकार व संसदीय कार्यमंत्री मा.श्री.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.आर.आर.पाटील होते. प्रमुख पाहुणे मा. खासदार श्री. मारोतराव कोवासे, जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ.भाग्यश्री आत्राम, मा.आमदार डॉ.नामदेव उसेंडी, मा.आमदार श्री. आनंदराव गेडाम, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे माजी उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी मा.श्री.अरविंद सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रंचित सावकार पोरेड्डीवार, पुणे येथील सहकारी संस्था निबंधक व सहकार आयुक्त मा.श्री.मधुकर चैाधरी, सहकार विभागाचे सचिव मा.श्री.राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी मा.श्री.रणजितकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.रूचेश जयवंशी, रॉकांचे प्रदेश सचिव तथा नगरसेवक मा.श्री.सुरेश सावकार पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाश सावकार पोरेड्डीवार, बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री.बळवंत लाकडे, मा.श्री.त्रियुगीनारायण दुबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.हसनअली गिलानी, काँग्रेसच्या सगुना तलांडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.सतीश आयलवार, गडचिरोली जिल्हा उपनिबंधक मा.श्री.जयेश आहेर, नागपुरचे विभागीय निबंधक मा.श्री.संजय कदम प्रामुखाने मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य, सहकारक्षेत्र व जिल्हा विकासात योगदान अषा वेगवेगळ्या बाबींवर विस्तृत माहिती देत जिल्हा विकासासाठी सहकारक्षेत्राला बळकट करण्याची विनंती केली. मा.श्री.अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनीही सहकारक्षेत्राच्या बळकटीकरणासाठी मंत्रिमहोदयांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मा.आमदार डॉ.नामदेव उसेंडी, मा.श्री.आमदार आनंदराव गेडाम, मा. खासदार श्री.मारोतराव कोवासे, जिल्हा परिषद अध्यक्ष मा.सौ.भाग्यश्री आत्राम यांनीही भाषणातून सहकारक्षेत्र, घटना दुरूस्ती, बँक व एकुणच जिल्हा विकासाबाबतच्या प्रक्रियेवर माहिती दिली. मंर्तिमहोदयांनी सहकारक्षेत्राला नवसंजीवनी देऊन या क्षेत्राच्या माध्यमातून जिल्हा विकासाची प्रक्रिया गतिमान करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
सर्वांच्या अपेक्षाची गांभीर्याने दखल घेऊन मा.श्री.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, जिल्हावासींच्या मागण्या त्यांच्या जीवनमानावर आधारित आहेत. अर्थातच त्या लहान स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे या मागण्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. सहकारी बँकेचे कार्य कौतुकास्पद आहे. जिल्ह्याचे सहकारक्षेत्र बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
मा.श्री.आर.आर.पाटील यांनीही सहकारक्षेत्राची जिल्हा विकासात महत्वाची भुमिका असल्याचे स्पष्ट केले. सहकारक्षेत्राशी जिल्हावासींचे अर्थकारण जुळले आहे. त्यामुळे हे क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी घटना दुरूस्तीच्या तरतुदी महत्वाच्या ठरल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मेळाव्याचे संचालन प्रा.श्री.नरेंद्र आरेकर, तर आभार श्री.सतीश आयलवार यांनी मानले. मेळाव्याला जिल्हाभरातील सहकारी संस्था, महिला बचतगटांचे पदाधिकारी, सदस्य, महिला, पुरूष व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
|