महाराष्ट्रतील संपुर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधुन 2012-13 या वर्षाच्या आर्थिक निकषांवर मंबईच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशनतर्फे वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 30 सप्टेंबरला मुंबईतील रविंद्र नाटय मंदीर येथे पार पडलेल्या विशेष समारंभात मंबईच्या रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एस. करुप्पासामी यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेडीवार, उपाध्यक्ष डॉ बळवंत लाकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार, व्यवस्थापक अरुण निंबेकार यांनी स्विकारला.
महाराष्ट्र राज्य बॅंक असोसिएशनतर्फे दरवर्षी आर्थिक वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपुर्ण महराष्ट्रातील दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. निवड करतांना रिझर्व बॅंक ऑफ इंडिया व नाबार्ड यांनी दिलेले आर्थिक निकष, त्यात प्रामुख्याने बॅंकेची आर्थिक स्थिती, स्वनिधीतील वाढ, कर्ज व्यवहार, एन.पी.ए. चे प्रमाण, ऑडीट वर्ग, सामाजीक बांधीलकी व वित्तीय समावेशन अंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या, नफयाचे प्रमाण इत्यादी बाबींचा विचार करण्यात येतो.
गडचिरोली जिल्हयात शाखांचे अर्धशतक गाठुन मोठी कामगिरी बजावणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वैकुंठभाई मेहता उत्कष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा पुरस्कार प्राप्त करण्याचा षटकार ठोकुन मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. यापुर्वी या बॅंकेला हा पुरस्कार विभागीय स्तरावर तब्बल पाचवेळा बहाल झाला आहे आता हा राज्यस्तरावरचा पुरस्कार पटकावुन बॅंकेने पुरस्काराचाही षटकार ठोकला आहे.
|
|