लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
वैयक्तीक गृह कर्ज
अटी व शर्ती :
उद्देश 1. कर्जदार सभासदास घर बांधण्याकरीता
2. नविन फ्लॅट खरेदी
3. 5 वर्षापुर्वी बांधलेले तयार घर खरेदी करण्याकरीता.
पात्रता सदर योजना ज्यांचे पगार बँकेमार्फत होत आहेत असे शासकीय, निमशासकीय, जिल्हापरिषद, पंचायत समिती कर्मचारी मान्यता प्राप्त शाळांचे/महाविद्यालयाचे कर्मचायांकरीता तसेच बँकेमार्फत पगार होणाया कर्मचर्याना व्यतिरीक्त शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापणातील कर्मचारी तसेच व्यावसायीक व इतर सभासद सुध्दा घर बांधणी कर्जास पात्र राहतील.
कर्जाची रक्कम 1) नविन बांधकामाकरीता - जास्तीत जास्त 30.00 लाख अथवा बांधकाम इस्टीमेटच्या 85% यापैकी जी रक्कम कमी असेल.
2) 5 वर्ष जुने घर खरेदीकरीता - बँकेच्या पॅनलवरील मुल्यांकन/इंजिनिअर कडुन ठरवून घेवून तसेच दरवर्शी 7.95% (झीज) अवक्षयन आकारुन येणार्या किंमतीच्या 60% किंवा जास्तीत जास्त 15.00 लाख यात जी रक्कम कमी असेल.
कर्जाचा कालावधी 1) सदर गृह कर्ज योजना 2 ते 20 वर्ष मुदतीकरीता असेल.
व्याजदर 1) नविन घर कर्ज/नविन फ्लॅट खरेदी 5 वर्ष जुने घर खरेदी - 7.95%
2) थकीत कर्जावर दंड व्याज - 1%
विमा (Insurance) Comprehensive Insurance
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) ज्या जागेवर घर बांधावयाचे आहे ती जागा स्वमालकीची व अकृशक असल्याचे दस्ताऐवज.
2) जागेचा 7/12 व 8‘अ’
3) ज्या जागेवर घर बांधवयाचे आहे त्या जागेचे खरेदी बाबत दस्ताऐवज.
4) घराचा प्लॅन व इस्टीमेट/आर्किटेक्ट यांचे सही शिक्यानिशी.
5) ग्रामपंचायत, नगर परिशदेची बांधकाम मंजुरी परवानगी पत्र
6) जागेचा व प्लॅटचे सर्च रिपोर्ट अधिकृत बँकेच्या पॅनल वरील वकीलाकडून घ्यावा लागेल. कागदपत्राच्या मुळ प्रती जोडाव्या लागेल. त्याकरीता येणारा खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.
7) मुल्यांकन अहवालानुसार कर्जाची उचल हप्तेवारीने द्यावयाची असल्याने त्याकरीता येणारा खर्च (प्रोसेसिंग चार्जेस) रु. 1500/- अर्जदारास स्वतः करावा लागेल.
8) घराचा विमा, रजिस्टर्ड गहाण खत, प्रामिसरी नोट, पगारातून परस्पर कर्ज हप्ता कपातीबाबत हमीपत्र, 2 जमानतदार, वारसदार, प्रतिज्ञापत्र इ.
9) अर्जाची किंमत रु. 50/- राहील. अर्जदारास त्याचे 2 फोटो द्यावे लागतील. नोकरीबाबत अद्यावत माहिती द्यावी लागेल.
10) तयार घर विक्री संबंधाने ग्रामपंचायत/नगरपालिका हयाचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागेल.
11) तयार घर खरेदी करावाचे असल्यास घराचा अद्यावत टॅक्सचा भरणा केला असल्याबाबतच्या मुळ पावत्या अर्जासोबत सादर कराव्या लागतील.
12) तयार घर खरेदी संबंधाने सौदा चिठ्ठिची मुळ प्रत अर्जासोबत सादर करावी लागेल.
13) तयार घरा व कर्जाची मर्यादा प्लाट व तयार घराची किंमत बँकेच्या पॅनल वरील मुल्यांकन/इंजिनिअरकडुन ठरवून घेवून तसेच दरवर्शी 10% (झीज) अवक्षयन आकारुन येणा-या किंमतीच्या 60 किंवा जास्तीत जास्त 15.00 लाख यात जी रक्कम कमी असेल ती रक्कम कर्ज मंजूरीस पात्र राहील.
14) पगारदार कर्मचा-याकडून रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर बँकेकडील असलेली कर्जबाकी निरंक होईपर्यंत कर्जदाराचे पगार बँकेमार्फतच करण्यात यावे असे हमीपत्र कर्जदार सभासदाला भरुन द्यावे लागेल.
   
Designed by Trust Systems