जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आर्थिक साक्षरता कक्षाचे उद्घाटन राज्याचे सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, राज्याचे गृहमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मा. श्री. आर.आर. पाटील यांच्या हस्ते दि. 15 नोव्हेंबर 2013 रोजी करण्यात आले.
यावेळी मा.खा.श्री.मारोतराव कोवासे जिल्हा परिषद मा.सौ.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, मा.आ. डॉ. श्री. नामदेव उसेंडी, सहकार महर्शी मा. श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रंचित पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मा.आ.श्री.आनंदराव गेडाम, जिल्हाधिकारी मा.श्री.रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रूचेश जयवंशी, बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री.बळवंत लाकडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.सतीश आयलवार, बँकेचे संचालक मा.डॉ. दुर्वेश भोयर, मा.श्री.त्रियुगी दुबे, मा.श्री. खुशाल वाघरे आदी उपस्थित होते.
|
|
कार्यक्रमांरभी मान्यवरांच्या हस्ते आर्थिक साक्षरता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान गृहमंत्री तथा पालकमंत्री मा.श्री.आर.आर. पाटील, सहकार व संसदीय कार्यमंत्री मा.श्री.हर्षवर्धन पाटील यांनी साक्षरता कक्षात लावण्यात आलेल्या प्रदर्षनाची पाहणी करुन मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातुन राबविण्यात येणा-या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी सहकार महर्शी मा.श्री.अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी जिल्हयाच्या ग्रामीण भागातील गावांना बँकेची सुविधा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने बँकेच्या शाखा निर्माण करुन दिल्या आहेत तसेच बँकेचे अध्यक्ष मा.श्री.प्रंचित पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याने नाबार्डतर्फे बँकेला पुरस्कार मिळाला आहे. नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हयातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना बँकशी जोडण्यासाठी व बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या योजनांची माहिती मिळण्यासाठी येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आर्थिक साक्षरता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बँकेच्या योजनांची माहिती मिळणार असून त्यांचा आर्थिक विकास सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी मंत्रीमहोदयासमोर सांगितले.
त्याचप्रमाणे बँकेचे मुख्य कार्यकारी मा.श्री. अधिकारी सतीश आयलवार यांनी बँकेशी निगडित असलेल्या योजनांची सर्व माहिती दिली. यावेळी बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. |